बोंडले विकास सेवा सोसायटीच्या सभासद शेतकर्यांची दिवाळी गोड होणार.
संस्था १५ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करणार.
बुधावरी दि.११ नोव्हेंबर रोजी ११ वाजता लाभांश वाटप सुरू.
विजयदिप न्यूज.
बोंडले (ता.माळशिरस) येथील बोंडले विविध कार्यकारी सेवा सोसायटी सभासदांना सन २०१९/२० च्या नफ्यावर दिवाळीसाठी १५ टक्के प्रमाणे लाभांश वाटप बुधवार दि.११ नोव्हेंबर रोजी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात करणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संतोषकुमार देशमुख, व्हा.चेअरमन दत्तात्रय लक्ष्मण जाधव व संचालक मंडळाने दिली.
बोडले विकास सेवा सोसायटीची चालू वार्षिक उलाढाल २ कोटी झालेली असून बँकेत रिझर्व फंड ७० लाख रुपये, बँकेचे शेअर्स २१ लाख रुपयाचे तर मुदत ठेव पावत्या ४३ लाख रूपयाच्या आहेत. सन २०१९-२० मध्ये संस्थेला निव्वळ नफा २३ लाख रुपये तर संचित नफा ४१ लाख रुपये एवढा झालेला असून संस्थेकडे सभासदांचे जवळपास ६१ लाख रुपयांचे शेअर्स भागभांडवल असून संस्था सभासदांना १५ टक्के प्रमाणे साधारणपणे ९ लाख १० हजार ४८६ रुपये एवढा लाभांश वाटप करणार असून सभासदांनी वसुलीसाठी संस्थेला केलेल्या सहकार्यामुळेच संस्था प्रगती पथावरती आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती सर्व व्यवहार ठप्प असताना व यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले असताना बोंडले विकासा सेवा सोसायटी लाभांश वाटप करणार असल्यामुळे संस्थेच्या सभासदात आनंदाचे वातावरण आहे.
सदर लाभांश हा संस्थेच्या कार्यालयात वाटप केला जाणार असुन सर्व लाभांश धारकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवरती लांभांश घेण्यासाठी येताना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असुन लाभांश घेण्यासाठी येताना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मास्क विना कोणी आल्यास लाभांश दिला जाणार नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.