इतर

सराव सामन्यात ‘एनएस क्रिकेट अकॅडमी’चा एकतर्फी विजय.

‘एनएस स्पोर्ट्स’ पंढरपूर संघाने प्रथम फलंदाजी करताना ३० षटकांमध्ये ७ बाद १६६ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये रुद्रा चौगुलेच्या नाबाद ५७ धावा तसेच वीर नॉर्टनच्या २७ धावा चे योगदान होते. तर ‘एनएस अकॅडमी’कडून वेदांत गोंजारी व भक्ती पवार यांनी प्रत्येकी २ विकेट तसेच निखिल शिंदे, आनंदी पाटील, शिवतेज इंगळे यांनी प्रत्येक एक विकेट घेतल्या.

‘एनएस स्पोर्ट्स’ पंढरपूरच्या १६७ धावांचा पाठलाग करताना वेदांत गोंजारी व भक्ती पवार यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर ‘एनएस क्रिकेट अकॅडमी’ने एकतर्फे विजय मिळवला यामध्ये वेदांत गोंजारीने अप्रतिम नाबाद ८६ धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर भक्ती पवारने २८ धावांचा संयमी खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्यात आरुष कासटच्या १६ धावाचे महत्वाचे योगदान होते. ‘एनएस स्पोर्टस’ संघाकडून स्वानंद कुलकर्णीने १ विकेट घेऊन आपल्या संघासाठी संघर्ष केला.

८६ धावांची अप्रतिम खेळी करणाऱ्या वेदांत गोंजारीला सामनावीराचा पुरस्कार तर अप्रतिम नाबाद अर्धशतकाची खेळी करणाऱ्या रुद्र चौगुलेला फायटर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!