‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्या’कडून ऊस बिल बँकेत वर्ग.
प्रती मे.टन शंभर रूपायाप्रमाणे बिलाची रक्कम अदा.
आतापर्यंत प्रती मे.टन एकूण रु.२५००/- प्रमाणे ऊस बिलाची रक्कम अदा.
विजयदिप न्यूज.
‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्या’ने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे.टन शंभर रूपये प्रमाणे बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू.१० कोटी जमा केली असल्याची माहीत चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
पुढे बोलताना चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक म्हणाले की, कारखान्याने प्रत्येक वर्षी शेतक-यांना गरजेचे वेळी पैसे उपलब्ध करुन दिले तसेच हंगाम २०२२-२३ मध्ये आसवनी प्रकल्प व इथेनॉल निर्मीती प्रकल्प ९० के.एल.पी.डी. क्षमतेने चालला असून १.७८ कोटी लि. उत्पादन घेतले. याचबरोबर ९.६१ लाख मे. टन ऊस गाळप करून ११.५० टक्के सरासरी साखर उताऱ्याने ९.५५ लाख क्विं.साखरेचे उत्पादन घेवून उद्दीष्ठपुर्ती केली.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले, संस्थापक चेअरमन स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या आदर्शाचा वारसा कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक जोपासत असून चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम २०२२-२३ अत्यंत उत्कृष्ठपणे चालला. त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळविला आहे. कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पहिल्या हप्त्या नंतरची ऊर्वरीत ऊस दराची देय रक्कम पोळा व दिपावली या सणास अदा करणेची आहे. परंतू यावर्षी अधीक महिना असल्याने पोळा सुमारे एक महिना पुढे गेला आहे. अशातच शेतकऱ्यांना ऊसाची मशागत, लागण करणेकरीता रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून प्रती मे.टन रु.१००/- प्रमाणे ऊस बिल संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करणेत येत असून यापुर्वी कारखान्याने दिलेले प्रती मे.टन रु.२४००/- व आताचे प्रती मे.टन रु.१००/- अशी एकूण रक्कम रु.२ हजार ५०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली असून ऊर्वरीत रक्कमही पोळा व दिपावली सणापुर्वी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे अदा करणार आहोत. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस लवकरात-लवकर गाळप व्हावा यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली असून हा हंगाम वेळेत सुरु करुन सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस ठरवून दिलेल्या वेळीपुर्वी गाळप करणार आहोत असेही डॉ.कुलकर्णी यांनी सांगीतले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे व संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तंज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याने कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.