‘पांडुरंग सहकारी’कडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता व अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.
टिम: विजयदिप न्यूज.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उशिरा ऊस तोड घेवून ऊस गाळपास दिला त्यांना धोरणाप्रमाणे अनुदानाची व या हंगामातील ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मे.टन रक्कम रु.१००/- प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणेत आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ. प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील व अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार कारखाना सुरु असुन आषाढी वारीचे औचित्य साधुन व ऊस उत्पादकांची आर्थिक गरज पाहुन गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उशिरा ऊस तोड घेवून ऊस गाळपास दिला त्यांना धोरणाप्रमाणे दि.१६ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रति मे.टन रक्कम रू. ५०/- प्रमाणे व दिनांक ३१ मार्च २०२२ नंतर हंगाम बंद होईपर्यंत ऊस गाळपास दिला अशा शेतकऱ्यांना प्रति मे.टन रू.१००/- प्रमाणे अनुदानाची व या हंगामातील ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मे.टन रक्कम रु.१००/- प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणेत आली आहे. तसेच कारखाना व्यवस्थापणाने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये २०१ दिवस कारखाना चालवून १२.५१ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून १४.२५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या हंगामातील साखर उताराही चांगला असुन तो जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. या हंगामात कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादनात उच्चांक निर्माण करुन सहकारात आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर को-जनरेशन प्रकल्प व आसवनी प्रकल्पही सुरळीत सुरु असुन तेही उच्चांक निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला. कारखान्याने नेहमीच सभासद ऊस उत्पादकांचे हित जोपासले असुन अर्थिक अडचणीच्या वेळी ऊस बिलाची रक्कम अदा केली आहे.
गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याकडे जास्तीचा ऊस असल्याने ऊस उत्पादकांना अवाहन करुन ऊस तोड उशिरा घेणाऱ्या शेतकऱ्यास अनुदान जाहीर केले होते. त्याप्रमाणे एकुण अनुदान रक्कम रु.२.४५ कोटी आणि या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचा प्रति मे.टन रक्कम रु.१००/- प्रमाणे दुसरा हप्ता आज रोजी बँकेत वर्ग करणेत आला आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी, बी.बियाणे, पेरणी करणेसाठी पैशाची गरज होती आणि गरजेच्या वेळी कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान व ऊस बिलाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा केल्याने आनंदाचे वातावरण आहे. पुढील गळीत हंगामात सुद्धा कारखान्याकडे ऊसाच्या नोंदी मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याने कारखान्याचा गळीत हंगाम हा लवकर सुरू करणेच्या दृष्टीने ऑफ सिझनमधील कामे जलद गतीने सुरू आहेत.
गळीत हंगाम २०२२१-२२ मध्ये उशिरा ऊस तोड घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, ऊस बिलाचा दुसरा हप्ता, तसेच या हंगामातील ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे तोडणी वाहतुक कमीशन व डिपॉझिट इत्यादी सर्व रक्कमा मिळून रक्कम रू. सुमारे ३० कोटी ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्या बँक खात्यावर आज रोजी वर्ग केल्या आहेत.
डॉ.यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक