आर्थिकसोलापूर जिल्हा

निशिगंधा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.

टिम: विजयदिप न्यूज.

निशिगंधा बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चेअरमन कल्याणराव काळे यांनी बँकेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेऊन रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ७ टक्के लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा केला जाईल असे जाहिर केले. तसेच थकबाकीदारांनी आपली थकबाकी वेळेत भरून बँकेस सहकार्य करावे व होणारी कटु कारवाई टाळावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 योगभवन, भक्तीमार्ग येथे पार पडलेल्या सभेच्या सुरूवातीस श्री.विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर व्हा.चेअरमन आर.बी.जाधव, संचालक देविदास सावंत, डॉ.मंदार सोनवणे, सतीश लाड, भागवत (महाराज) चवरे, विवेक कवडे, भानुदास सावंत, डॉ.राजेंद्र जाधव, अॕड.क्रांती कदम, शोभा लाड उपस्थित होते.

व्यवस्थापक कैलास शिर्के यांनी विषय वाचन केले, त्यास सर्व उपस्थित सभासदांनी आवाजी मतदानाने मंजूरी दिली. यावेळी अहवाल सालातील दिवंगत सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी बँकेचे सभासद जेष्ठ कर सल्लागार संजीव अभ्यंकर, धनंजय कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. सभेस सभासद यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, अर्जुन जाधव, दिपक शेगर, रमेश नागणे, बंडु अटकळे, लालचंद चोले, अनिल निकते, सतिश कटकधोंड, रामचंद्र जाधव, नंदकुमार जोशी, सत्यवान काळे (सर), अश्विनी साळुंखे, सुभाष भोसले, कैलास कारंडे, महेश चव्हाण, अतुल झांबरे, अरून लाड, संजीवनी शिरसाठ, नागनाथ मुदगल, विष्णु सुरवसे आदि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

सभेच्या पुर्वी एक तास सभासदांसाठी आयोजित केलेल्या “सभासद प्रशिक्षण ” वर्गामध्ये सहकार प्रशिक्षण केंद्र, शाखा सोलापूर यांचे प्रतिनिधींनी सभासदांचे हक्क व कर्तव्ये ९७ व्या घटना दुरूस्तीचे परिणाम, याबाबतची सखोल माहिती यावेळी देण्यात आली.

सुत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले, आभार व्हा.चेअरमन आर.बी.जाधव यांनी मानले.

आदर्श सभासद म्हणून यांचा झाला सत्कार

भाग्यश्री बडवे, नंदकुमार देवकर, अन्वर हुसेन शेख, हरि लिंगे, निला कारटकर, अजीत जाधव, अ‍ॅड.ज्ञानदेव शिकारे, संजय कौलवार, जितेश ढोबळे, बजरंग डोंबे.

बँकेचा ताळेबंद दि.३१ मार्च २०२२ अखेर

सभासद संख्या:४ हजार ६६९
ठेवीदार संख्या:२१ हजार ९६७
भागभांडवल:१ कोटी ४२ लाख ८४ हजार २००
ठेवी:३१ कोटी ९४ लाख २९ हजार ७७५
कर्जे:१८ कोटी ७८ लाख ३० हजार २२३
गुंतवणूक:१३ कोटी ७६ लाख १४ हजार ९४०
ढोबळ नफा:४५ लाख ३१ हजार ६४४
निव्वळ नफा:२३ लाख ३१ हजार ६४४
खेळते भांडवल:३७ कोटी १९ लाख ७६ हजार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!