डॉ.बी व्ही राव ‘मेमोरियल ट्रॉफी’चे शानदार उद्घाटन.
१५ वर्ष वयोगटाखालील महिला क्रिकेट स्पर्धा.
टीम विजयदीप न्यूज
डॉ.बी व्ही राव ‘मेमोरियल ट्रॉफी’चे शानदार उद्घाटन पिरंगुट येथील के रहेजा प्रॉपर्टी मधील विवा क्रिकेट ग्राउंड वर संपन्न झाले.
१५ वर्षे वयोगटाखाली महिला क्रिकेट ऑल इंडिया टूर्नामेंट स्पर्धेचे सलग अकरा वर्ष आयोजन केले जात आहे. सलामी सामन्याचे उद्घाटन पौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुभाष रांजणे, हेमंत किणीकर, पराग चितळे, श्रीकांत घोलप, रोहिणी हबीब, मनोज पवळे आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. गेली अकरा वर्ष डॉ.बी व्ही राव मेमोरियल ट्रस्ट या स्पर्धेचे आयोजन करीत आहे.
उद्घाटन पर सलामीचा सामना एच.के बाऊन्स विरुद्ध मावरिक्स क्रिकेट क्लब यांच्यात खेळला गेला.
क्रिकेट खेळामधून एकमेकांना घेऊन कसे पुढे जायचे याची चालना मिळते, फक्त फलंदाज खेळला व इतर खेळाडू खेळले नाही तर यशस्वी होत नाही. खेळात कोणीतरी विजयी तसेच पराजित होणार आहे. खेळाडूंनी आपल्यातील पूर्ण क्षमतेने प्रामाणिक खेळले पाहिजेल. तसेच योगदान दिले पाहिजे आणि हेच जीवनात उपयोगी पडणार आहे.
संतोष गिरी गोसावी
पोलीस निरीक्षक
पौंड पोलीस स्टेशन