सिंहगड पब्लिक स्कूलच्या संघाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी.
टिम : विजयदिप न्यूज.
माळशिरस येथे १४ वर्षे वयोगट मुली, १४ वर्षे वयोगट मुले व १७ वर्ष वयोगट मुलीच्या झालेल्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कोर्टी पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या संघाने बाजी मारत विभागीय स्पर्धेसाठी आगेकूच केली असून संघाच्या दमदार कामगीरीबद्धल खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.
राज्य क्रिडा व युवक कल्याण संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश मेडियम स्कूल माळशिरस येथे मंगळवार १६ जानेवारी व बुधवार १७ जानेवारी असे दोन दिवस जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलच्या १७ वर्ष वयोगट मुली, १४ वर्षे वयोगट मुली व १४ वर्षे वयोगट मुले यांच्या संघाने यांनी प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.
तीनही संघाने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक एम.एन नवले, कॅम्पस डायरेक्टर कैलास करांडे, शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मुलींचे कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी मुलींना क्रिडा शिक्षक स्वाती म्यागेरी, कुलदीप कोरडे, मल्हारी एकतपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.