नीरा खोऱ्यातील धरणात मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा कमी.
परस्थिती चिंता निर्माण करणारी.
विजयदिप न्यूज
यंदा मान्सून दाखल होऊन महिना होऊन गेलेला असलातरी देखील नीरा खोर्यातील धरणक्षेत्रात मात्र पावसाची कृपादृष्टी झालेली नाही. मागील वर्षी १७ जुलै २०२२ रोजी नीरा खोर्यातील धरणांची सरासरी टक्केवारी ६४.५२ टक्के होती. परंतु यंदा मात्र या धरणांची सरासरी टक्केवारी २६.९२ टक्के एवढी कमी आहे. अधून-मधून पडणार्या कमी-अधिक पावसामुळे या सर्व धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत असली तरीदेखील परस्थिती चिंता निर्माण करणारी आहे.
सोमवार १७ जुलै २०२३ रोजी नीरा खोर्यातील सर्व धरणांमध्ये एकूण पाणीसाठा १३.०१ टीएमसी तर सरासरी टक्केवारी २६.९२ टक्के एवढी झाली. मागीला वर्षी १७ जुलै २०२२ रोजी नीरा खोर्यात सर्व धरणात मिळून एकूण ३१.१८ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा तर सरासरी टक्केवारी ६४.५२ टक्के इतकी होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नीरा खोर्यात तब्बल १८.१७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा कमी आहे.
नीरा खोर्यातील धरणाची स्थिति दर्शविणारा तक्ता
(दि.१७ जुलै २०२३ सकाळी.६ वा)
धरण नाव | पाणीसाठा टीएमसी | टक्केवारी | मागील २४ तासातील पाऊस |
भाटघर | ६.३७ | २७.१० | १६ |
नीरा-देवघर | ३.५५ | ३०.३२ | ३७ |
गुंजवणी | ०.९९ | २६.८२ | २६ |
वीर | २.०९ | २२.२८ | – |