सोलापूर जिल्हा

जलसंधारण मंजूर कामांवरील स्थगिती अखेर उठली – आ.बबनराव शिंदे

शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार.

विजयदिप न्यूज.

राज्यात सत्तांतर झाल्याने माढा व पंढरपूर तालुक्यातील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील मंजूर कामांना स्थगिती देण्यात आली होती. अखेर या मंजूर कामांवरील स्थगिती शासन आदेशानुसार उठली असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व पंढरपूर तालुक्यातील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील कामांना मे-जून २०२२ या वर्षात १५ कोटी ३४ लाख इतक्या रक्कमेच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळालेली होती. परंतू राज्यात सत्तांतर झाल्याने मंजूर कामांना स्थगिती देण्यात आली होती.

अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की,  माढा मतदारसंघातील माढा व पंढरपूर तालुक्यातील काही भाग आवर्षण प्रवण क्षेत्रात येत आहे. त्या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अतंर्गत १२ जलसंधारण कामांना मे-जून २०२२ या वर्षात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतू जलसंधारणांच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. नुकतेच पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे प्रत्यक्ष भेटून पत्राव्दारे पाठपुरावा करणेत आला. त्यानुसार माढा विधानसभा मतदारसंघातील १५ कोटी ३४ लाख इतक्या रक्कमेची जलसंधारण कामावरील स्थगिती ३१ जुलै २०२३ रोजीच्या शासन आदेशानुसार उठली आहे.

जलसंधारण कामांतर्गत रुपांतरीत साठवण तलाव, गेटेड चेक डॅम, साठवण बंधारा व इतर कामांचा समावेश आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.

माढा मतदारसंघातील जलसंधारणाची होणार कामे.

माढा तालुका

अ.नकामाचे नांवरक्कम
वडाचीवाडी रुपांतरीत साठवण तलाव४,२८,४६,०१८/-
पालवण रुपांतरीत साठवण तलाव३,५०,२१,४२३/-
चव्हाणवाडी क्रं.१ गेटेड चेक डॅम१,१४,१६,६७५/-
चव्हाणवाडी क्रं.२ गेटेड चेक डॅम१,३५,२७,२२१/-
चव्हाणवाडी क्रं.३ गेटेड चेक डॅम१,३०,१२,१६७/-
चव्हाणवाडी क्रं.४ (अरुण सदाशिव चव्हाण गट नं.१३६) गेटेड चेक डॅम४४,८६,१९०/-

पंढरपूर तालुका

अ.नकामाचे नांवरक्कम
वाडीकुरोली गेटेड साठवण बंधारा९०,८०,८६६/-
व्होळे क्रं. १ साठवण बंधारा६५,७३,७०३/-
व्होळे क्रं. २  साठवण बंधारा६५,७४,२०४/-
भोसे (क) सटवाई मळा, गेटेड चेक डॅम४२.६५,१८२/-
मेंढापूर क्रं.१ गेटेड चेक डॅम३२,९३,४६७/-
मेंढापूर क्रं.२ गेटेड चेक डॅम३३,०६,३७१/-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!