कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशपातळावरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित.
कारखान्याच्या चार अधिकाऱ्यांचाही विविध पुरस्कारामध्ये समावेश
टिम विजयदिप न्यूज.
को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया कडून दिला जाणारा देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा बेस्ट को-जनरेशन प्रकल्प पुरस्कार पुणे येथे खा.शरदचंद्रजी पवार, जयप्रकाश दांडेगावकर, नरेंद्र मोहन, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबरोबरच कारखान्याच्या चार अधिकाऱ्यांना विविध पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक भगवान चौगुले, तानाजी वाघमोडे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया यांनी कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीच्या जोरावर कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पास देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोकृष्ट को-जनरेशन प्रकल्प हा पुरस्कार प्रदान केला आहे. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीय या देशपातळीवरील संस्थेने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने कमीत-कमी बगॅसमध्ये जास्तीत-जास्त विज निर्मीती, अंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले कार्बन क्रेडीट, कमी उत्पादन खर्च, कारखान्यास मिळालेले ISO सर्टीफिकेट व कारखान्याचे असलेल्या सुरक्षा योजना, कारखान्याचा सौर उर्जा प्रकल्प, कमीत कमी पाणी वापर, पाण्याचा पुर्णंवापर, को- जनरेशन प्लँटची क्षमता वापर या सर्व बाबीचा विचार करुन दिला आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार चालु असून त्याचे पालन कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक हे तंतोतंत करीत आहेत. ज्यावेळी को-जन प्लँट उभा केला त्यावेळी महाराष्ट्रात को-जनरेशन प्लँटचे प्रमाण खुप कमी होते. परंतू श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक व संचालक मंडळाचे सहकार्याने कारखान्याचा को-जन प्लँट यशस्वी चालुन त्यामधुन जास्तीत-जास्त विज निर्मीती करुन कारखान्यास आर्थीक उत्पान्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. कारखान्याने को-जनरेशनमध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळेच कारखान्यास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडुन देशपातळीवरील सर्वोच्च को-जन प्लँट म्हणुन गौरविणेत आले आहे.
कारखान्याबरोबरच कारखान्याचे अधिकारी सचिन विभुते यांना बेस्ट को-जन मॅनेजर (विशेष), समीर सय्यद यांना बेस्ट इन्स्ट्रुमेंट मॅनेजर, बाळासाहेब होरे यांना बेस्ट इलेक्ट्रीक मॅनेजर तसेच सत्यवान जाधव यांना बेस्ट ई.टी.पी. मॅनेजर असे पुरस्कार मिळाले. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने को-जनरेशन प्रकल्पाचे विस्तारीकरण केले असून या हंगामापासून को-जनरेशन प्रकल्प वाढीव क्षमतेने चालणार आहेत.