धरण पाणीसाठाशेतीविषयक
उजनीत येणारी पाण्याची आवक घटली.
उजनी @२२.६० टक्के
विजयदिप न्यूज
उजनीच्या वरील पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोटक्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर पावसाची दडी कायम असून भीमा खोऱ्यातील धरणांमधून सोडला जाणारा विसर्ग जवळपास बंद केला गेला असल्याने उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक घटली आहे.
दि.०९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता २४७०१ क्युसेक्सवर पोहोचलेला विसर्ग आज मंगळवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता ४७७६ क्युसेक्स आहे.
उजनी धरण अहवालानुसार स.६ वा. उजनीची पाणी पातळी ४९२.६४० मीटर, एकूण पाणीसाठा २१४५.६२ द.ल.घ.मी म्हणजेच ७५.७६ टीएमसी, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३४२.८१ द.ल.घ.मी म्हणजेच १२.१० टीएमसी असून धरण टक्केवारी २२.६० टक्के झाली.
भीमा खोरे धरण अहवाल खालील प्रमाणे:-