शेतीविषयकसोलापूर जिल्हा

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’कडून जिल्हयात सर्वाधिक ऊस दर.

पोळा सणासाठी प्रती मे.टन रु.१००प्रमाणे हप्ता.

विजयदिप न्यूज

सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने पोळा सणासाठी प्रति मे.टन १०० रुपयाप्रमाणे हप्ता काढला असून सोलापूर जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला. कारखान्याने २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला आतापर्यंत २ हजार ६०० रुपये दर देऊन उच्चांक केला.

पोळा सणासाठी प्रती मे. टन रू.१००/- प्रमाणे ऊस बील दिलेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना महत्वाचा असणारा पोळा सण मोठ्या आनंदात साजरा करणेसाठी पैशाची गरज असताना कारखान्याने ऊस बिलाची रक्कम बँकेत खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.१००/- प्रमाणे हप्ता काढला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलाची एकूण रक्कम १० कोटी जमा केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यास पोळा, दिपावली सारख्या सणासाठी योग्यवेळी पैसे उपलब्ध करुन दिले आहेत. पोळा सणासाठी हप्ता देणेची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवीली. कै,सुधाकरपंत परिचारक यांच्या आदर्शाचा वारसा व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी यांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील असेही चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.

कारखान्याने चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम २०२२-२३ अत्यंत उत्कृष्ठपणे चालवला. मा,आ,परिचारक यांच्या सुयोग्य नियोजनामुळे कारखान्याने जिल्हयात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळविला असून जिल्हयात प्रथम क्रमांकाचा ऊस दरही देणार आहे. आजपर्यंत कारखान्याने प्रति मे.टन २ हजार ६०० प्रमाणे ऊस बील अदा केले असून ऊर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम दीपावळीस अदा करणार केली जाणार आहे. पुढील हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण होणार असून प्रती दिन ९ हजार मे.टन प्रमाणे गाळप होणार आहे.

गळीत हंगाम २०२३-२४ हा वाढीव कार्यक्षमतेने चालविणेसाठी कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक, अधिकारी व कामगार वर्गाच्या सहकार्याने कारखान्यामधील सर्व कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पुर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतुक यंत्रणा सक्षमपणे उभारली आहे.

डॉ.यशवंत कुलकर्णी,

कार्यकारी संचालक.

यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे व संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तंज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याने कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!