आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
विजयदिप न्यूज
माळशिरसचे आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील ३५ गावांना विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने या गावातील सभागृह बांधणे, रस्ता तयार करणे, सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे, ड्युअल सौर पंप बसविणे, सभामंडप शुशोभीकरण करणे, सौर दिवे बसविणे, मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, वाचनालय आदी विविध विकास कामे होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांना सातत्याने भरीव निधीची तरतूद करणारे आ.राम सातपुते हे सातत्याने विकास कामांकरिता राज्य शासनाकडून जास्तीचा निधी माळशिरस तालुक्यासाठी आणत आहेत. यातच त्यांनी तालुक्यातील नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या गावांचा, वस्त्यांचा विकास करण्याकरिता या घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्याकरिता ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
यामध्ये रस्ते कामासाठी झिंजेवस्ती, विझोरी, चाकोरे, गोरडवाडी, शिंगोर्णी, दत्तनगर खंडाळी, सुळेवाडी, मगरवाडी, दहिगाव, काळमवाडी, बचेरी, कण्हेर या गावांसाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सभागृहासाठी गारवाड, कचरेवाडी, मळोली, कोथळे, गुरसाळे ५० लाख. सभा मंडप बाभूळगाव, धर्मपुरी, जळभावी, विजयवाडी, फोंडशिरस, फडतरी, उंबरे दहिगाव, मांडवे, डोंबाळवाडी खु, मोरोची, धानोरे, पठाणवस्ती, जाधववाडी, तांबेवाडी, दहिगाव, कोंडबावी, सदाशिवनगर १ कोटी ७० लाख.
सुशोभीकरण मोटेवाडी, तरंगफळ, भांब, माळशिरस ९० लाख.
सौरदिवे माणकी, पिंपरी कोळेगाव, कोथळे, नातेपुते, कारूंडे ६० लाख.
स्वच्छतागृह तिरवंडी १० लाख असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.