आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यास यश.
अकलूज नगर परिषदेसाठी दहा कोटींचा निधी मंजूर.
विजयदिप न्यूज.
राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत अकलूज नगर परिषदेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. यासाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
नगर विकास मंत्रालयाकडून राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेच्या सुधारित निकष व मार्गदर्शक तत्त्वानुसार अकलूज नगरपरिषदेला विविध विकास कामांसाठी दहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी डिसेंबर २०२२ पासून लेखी निवेदनासह सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अकलूज नगर परिषदेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
एका वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने अकलूज नगरपरिषदेतील नागरिकांमधून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विशेष लक्ष घातल्याने एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
अकलूज नगर परिषद हद्दीतील एकूण २७ कामांसाठी हा दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गत कांही महिन्यांमध्ये माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज नगर परिषद, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत, माळशिरस नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत यासाठी येथील पदाधिकारी व नागरिकांबरोबर वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्याकडून विकास कामांचे प्रस्ताव तयार करून घेऊन शासनाकडे विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू ठेवल्याने या चार गावांसह इतर सर्व गावातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.