वेळापूर पोलिसांनी पकडले जिवंत काडतुस व गावठी पिस्तूल.
वेळापुर पोलीसांची कामगीरी
टिम विजयदिप न्यूज.
वेळापूर पोलिसांनी जिवंत काडतुस व गावठी पिस्तूलसह एकास पकडून दमदार कामगिरी केली. गुन्ह्यातील आरोपी चिक्या उर्फ सुमित साखरे (रा.वेळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार १८ डिसेंबर रोजी वेळापुर पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश बागाव व पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, हवालदार यशवंत आनंदपुरे, बापु पवार, पठाण, गणेश माळी हे पोलीस कर्मचारी पोलीस वाहनाने गस्त करीत असताना वेळापूर येथील चिक्या उर्फ सुमित संजय साखरे हा गावठी पिस्तूल बाळगून तलाठी कार्यालयजवळ मोटरसायकल वरून येत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाल्याने वेळापूर पोलीस तलाठी कार्यालय येथे पोहोचले असता चिक्या उर्फ सुमित साखरे रा.वेळापूर हा समोरून मोटरसायकल वरून येत असल्याचे पोलिसांना मिळालेल्या माहिती प्रमाणे संशय आल्याने चार चाकी वाहनातून पोलीस खाली उतरून चिक्या उर्फ सुमित संजय साखरे यास थांबविले.
चिक्या उर्फ सुमित साखरे हा गाडीवरून खाली उतरून पोटाच्या खालील बाजूस जीन पॅन्ट मध्ये खोवलेले एक पिस्टल बाहेर काढले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ गराडा घालून पकडून त्याच्या जवळील गावठी पिस्तूल सपोनि निलेश बागाव यांनी ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुस तसेच एक एच एफ डीलक्स मोटरसायकल जप्त करून त्यास वेळापूर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा रजिस्टर नंबर३२८/२०२३ भादवि भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात आरोपी चिक्या उर्फ सुमित साखरे यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सपोनि निलेश बागाव करीत आहेत.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज डॉ.सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, पोलीस हवालदार यशवंत आनंदपुरे, बापु पवार, पठाण, गणेश माळी यांनी कामगीरी बजावली.