मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीमध्ये आरक्षण निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा यासाठी रिपाईची निदर्शने.
टीम विजयदिप न्यूज.
मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा यासाठी अकलुज उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट माळशिरस तालुक्याच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
मागासवर्गीय कर्मचारी यांचे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा, या मागणीसाठी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार व माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या नेतुत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात १ जून ते ७ जून निदर्शने करण्याचे ठरले असुन याचाच भाग म्हणुन आज माळशिरस तालुक्याच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास लवकरच तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माळशिरस तालुकाध्यक्ष प्रा.नरेंद्र भोसले यांनी दिला आहे.
पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गाचा हक्क आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले असताना सुध्दा स्वत:ला पुरोगामी म्हणणारे राज्यातील महाविकास आघाडी सरकार असलेतरी पदोन्नतीमधील मागासवर्गीय आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे असेही प्रा.भोसले म्हणाले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव एन.के.साळवे, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, प्राचार्य बनसोडे, जिल्हा युवक कार्यध्यक्ष किरणतात्या धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष नितिन मोरे, तालुकाध्यक्ष प्रा.नरेंद्र भोसले, जिल्हा युवक उपाध्यक्ष संतोष चंदनशिवे, तालुका उपाध्यक्ष राम कांबळे, तालुका उपाध्यक्ष संजय भोसले, तालुका युवक उपाध्यक्ष बाबुराव भोसले, प्रविण साळवे, आय.टी.सेल तालुका सरचिटणीस युवक दशरथ नवगिरे, अकलुज शहर अध्यक्ष नितिन मोरे, उपाध्यक्ष असिफ शेख, अकलुज युवक अध्यक्ष अभिजित वाघमारे, सदाशिवनगर राजु जाधव, श्रीपुर शहर अध्यक्ष बापुसो पोळके, सरचिटणीस राजाभाऊ सुरवसे, उपाध्यक्ष समाधान लांडगे, राहुल धाईंजे आदी पदाधिकारी उपस्थित होते.