रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह; अनेक बड्या नेत्यांच्या संपर्कात आले होते.
प्रशासन यंत्रणा हादरली.
टीम विजयदिप न्यूज.
“ग्लोबल टिचर अवॉर्ड” हा तब्बल ७ कोटी रुपयाचा अवॉर्ड जिंकणारे सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांची कोरोना चाचणी बुधवारी पॉझिटिव्ह आलेली आहेत. त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सन्मानित केले आहे. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले आहेत.
या घटनेमुळे प्रशासन यंत्रणा हादरली असून डिसले गुरुजी सोबतच त्यांच्या पत्नी सुद्धा कोरोनो पॉझिटिव्ह आल्या आहेत. डिसले गुरुजींना जागतिक पातळीवरील ग्लोबल पुरस्कार मिळाला असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक येत आहेत.