‘पांडुरंग सहकारी’च्या वतीने तोडणी मजूरांसाठी जेवण व निवासाची सोय -आ.प्रशांतराव परिचारक.

प्रत्यक्षात ‘पांडुरंग’च मदतीला आल्याची मजुरांची भावना.

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग कारखाना हा नेहमीच स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार ऊस उत्पादक सभासद शेतकरी, मजूर यांच्या अडचणीच्या काळात उभा राहून त्यांना मदत करत असतो बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे तोडणी मजुरांच्या राहण्याचा व जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कारखान्याने तातडीने ठीक-ठिकाणी राहणार्या मजुरांना निवारा व त्यांच्या भोजनाची सोय केली आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली
कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या गरजूंना वेळीच मदत करण्याच्या स्वभावामुळे कारखान्याकडे तोडणी वाहतूकीस आलेल्या कारखाना स्थळावरील मजुरांची सोय कारखान्यामार्फत गणेश हॉल येथे तर इतर ठिकाणी असलेल्या मजुरांची सोय कारखान्यामार्फत मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी तोडणी मजुराच्या सोयीच्या दृष्टीने प्रत्येक गावात करण्यात आली आहे. ऊस तोडणी मजुराविषयी असलेला आपुलकीच्या भावणेमुळे मजुरांना कारखाना, कारखाना पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा अभिमान वाटत आहे.
यावेळी माहिती देताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, पांडुरंग सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असून कारखान्याचा ऊस तोडणी मजुर कारखानास्थळावरती तसेच कार्यक्षेत्रात ठिक-ठिकाणी शेतातच वस्ती करून राहत आहेत. बुधवारी मध्यरात्री पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांचे हाल झाले आहेत. पावसामुळे तोडणीचे काम बंद पडले आहे. तर तात्पुरत्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मजुरांचे हाल होत आहेत. या कामगारांना त्रास होऊ नये म्हणून कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या सांगण्यानुसार तातडीने ठीक-ठिकाणी मजुरांच्या निवार्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.
कारखान्याच्या तोडणी मजुरांना अवकाळी झालेल्या पावसाचा कसलाही त्रास होऊ नये म्हणून कारखान्याचे वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, केन मॅनेजर एस. सी. कुमटेकर, चीफ अकौंटंट आर. एम. काकडे, सिव्हील इंजि. एच. एस. नागणे, डिस्टीलरी मॅनेजर एस. ई. शेख, मटेरिअल मॅनेजर एम. जे. देशपांडे, वैद्यकिय निवासी अधिकारी एस. एस. पोफळे, को-जन मॅनेजर एस. एस. विभुते, ऊस विकास अधिकारी एस. पी. भालेकर, डे.चिफ.इंजी. ए. डी. बारटक्के, डे.चिफ.केमिस्ट एम.एल.उपासे, कॉम्प्युटर इंचार्ज टी. एस. भोसले, स्थावर अधिकारी आर. डी. गाजरे, हेड टाईम किपर एस. एन. कदम, इन्युट्रमेंट मॅनेजर एस. वाय. सय्यद, सहा.कार्यालयीन अधिक्षक बी.एस.बाबर आदि परिश्रम घेत आहेत.