विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर ऊस तोडणी मजूरांसाठी कोव्हीड लसीकरण- आ.बबनराव शिंदे

विजयदिप न्यूज.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्याचा सन २०२१-२२ चा गळीत हंगाम सुरू असून या हंगामात ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूरांना कोव्हीड-१९ चे पार्श्वभुमीवर लसीकरण मोहीम राबविणेत येत असलेची माहीती कारखान्याचे चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ गळीत हंगाम सुरू असून गाळपक्षमते एवढा ऊसाचा पुरवठा होणेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करणेत आलेले आहेत तसेच यंत्रणा कामावर हजर झालेली आहे. ऊस तोडणीसाठी बीड, जालना, नंदूरबार, जामखेड व इतर भागातून आलेल्या ऊस तोडणी मजूरांसाठी कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळनेर यांचे मदतीने कोव्हीड-१९ चे पार्श्वभुमीवर लसीकरण मोहीम राबविणेत आल्याची माहीती त्यांनी दिली.
सदर लसीकरण शिबीराचे उदघाटन कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी केन मॅनेजर संभाजी थिटे, मुख्य शेतकी अधिकारी सुनिल बंडगर, हेडक्लार्क मुलाणी जे.बी, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळनेर येथील नर्सिंग स्टाफ व मोठ्या संख्येने तोडणी मजूर उपस्थित होते. कोव्हीड-१९ चे पार्श्वभुमीवर ऊस तोडणी मजूरांनी लसीकरणासाठी जास्तीत सहभाग नोंदवून लसीकरण करावे असे आवाहन कार्यकारी संचालक यांनी याप्रसंगी केले.