शेतीविषयकसोलापूर जिल्हा

विठ्ठल कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राजेंद्र रणवरे.

बेंबळे: मुकुंद रामदासी.

करमाळा-माढा मतदार संघाचे आ.संजयमामा शिंदे यांच्या म्हैसगाव (ता.माढा) येथील विठ्ठल कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राजेंद्रकुमार सूर्यकांत रणवरे यांची १ सप्टेंबर पासून नियुक्ती करण्यात आली याबद्दल आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते रणवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी निमगाव (टे.)चे सरपंच व विठ्ठल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंतभैय्या शिंदे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

राजेंद्र रणवरे हे इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील असुन त्यांनी आपल्या साखर कारखानदारीतील सेवेची सुरुवात सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्यात शेती सुपरवायझर म्हणून केली. आपल्या कार्यकुशलतेमुळे नंतर ते श्रीपुर येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात शेती अधिकारी म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. पुढे माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ते १२ वर्षे कार्यकारी संचालक होते. तसेच त्यांनी दौंड, उमरगा व पाटस येथील साखर कारखान्याचे मुख्याधिकारी म्हणून १ वर्ष काम केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी-पुणे या संस्थेचे रणवरे हे मानद सचिव असून डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेतही रणवरे यांनी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य कार्यकारी संचालक (एम.डी) असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

विठ्ठल कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोलापूर व पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर तसेच अकलूज, इंदापूर व टेंभुर्णी परिसरातील अनेक प्रतिष्ठित बागायतदार, व्यापारी व नागरिकांनी रणवरे यांचे अभिनंदन केले. सहकारी संस्थेतील अतिशय कार्यकुशल, अभ्यासू, कर्तव्यदक्ष, अचूक नियोजन व योग्य निर्णयक्षमता असलेले अधिकारी म्हणून रणवरे यांचा सर्वत्र नावलौकिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!