आ.बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

टिम: विजयदिप न्यूज.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माढा विधानसभेचे आ.बबनराव शिंदे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त श्री.ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, श्रीपुर येथे विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, निमगाव(टें) यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३१० रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

प्रारंभी विघ्नहर्त्या श्री.गणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदान शिबीरास महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते राहुल कुंडलिक रेडे-पाटील, भाजप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य राजकुमार(नाना) पाटील, नगरसेवक नामदेव इंगळे, रावसाहेब सावंत-पाटील, शिवाजी रेडे-पाटील, मौला पठाण, नामदेव पाटील, विक्रम लाटे, दादासाहेब लाटे, जांबुड सोसायटी चेअरमन राहुल खटके-पाटील, सुनील राजमाने, माळखांबी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन मनोज शेळके, भाऊसाहेब भांगे, राहुल टिक, निशांत पाटील, खळवे सरपंच अशोक कदम, माऊली प्रधान, बोरगावचे माजी सरपंच दत्तात्रय म्हसवडे, नितीन मंडवळे, अॅड.सुदर्शन शेळके-पाटील, दादासो गमे-पाटील, सागर भांगे, सागर चव्हाण, माळखांबी सोसायटीचे व्हा.चेअरमन वसुदेव शेळके-पाटील, अमोल गमे-पाटील, आणणासो भांगे, रामचंद्र शेळके-पाटील, गौरव चव्हाण, सोमनाथ चव्हाण, नेताजी माने-देशमुख, गजानन पाटील, औदुंबर अवचर, पांडूरंग व्यवहारे, दयानंद पाटील, हरिदास व्यवहारे, नवनाथ पवार, जांबुड माजी सरपंच नारायण पाटील, अनिल पाटील, रविराज बनसोडे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी सुनील बंडगर, यांच्यासह माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील १४ गावातील नेते, कार्यकर्ते, कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, युवक, महिला रक्तदान शिबीरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माळशिरस विभागातील विभाग प्रमुख प्रदीप राजमाने, चंद्रकांत सावंत, विकास खटके चैतन्य चव्हाण, निशांत शेळके, बबन नवगिरे, अतुल कचरे, हर्षद शेळके, नितीन शेळके, वैभव शेळके, तानाजी कचरे, अमरसिंह भाग्यवंत, दादा माने आदींनी परिश्रम घेतले.