आर्थिकमहाराष्ट्रशेतीविषयकसोलापूर जिल्हा

विठ्ठलराव शिंदे कडून ऊस बिलाचा दूसरा हप्ता ऊस पुरवठादारांच्या बॅंक खात्यावर वर्ग- आ.बबनराव शिंदे

टिम: विजयदिप न्यूज.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ येथे गाळप केलेल्या ऊसासाठी प्र.मे.टन रू.२५०/- प्रमाणे दूसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर येथे २४ लाख ७८ हजार ९२२ मे.टन ऊसाचे गाळप करून ११.५२ टक्के (बी.हेव्ही व सिरप सह) साखर उता-याने २३ लाख ४५ हजार क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे. तसेच युनिट नं.२ करकंब येथे ६ लाख ५५ हजार ५६४ मे.टन ऊसाचे गाळप करून ११.५३ टक्के (बी.हेव्ही सह) साखर उता-याने ६ लाख ६० हजार ०५० क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे. दोन्ही युनिटचे मिळून ३१ लाख ३४ हजार मे.टनाचे देशामध्ये  विक्रमी गाळप केलेले आहे.

ऊस गाळप हंगाम २०२१-२२ साठी युनिट नं.१ व २ कडे गाळप झालेल्या ऊसास यापुर्वी प्र.मे.टन रू.२ हजार १०० प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला आहे. सध्या ऊस पुरवठादार शेतक-यांना ऊस पीक मशागत, जोपासणी साठी पैशाची गरज आहे. त्यामुळे कारखान्याने येणा-या बैलपोळासणासाठी ऊस पुरवठादार शेतक-यांना उर्वरीत देय ऊस बीलापैकी प्र.मे.टन रू.२५०/- प्रमाणे दूसरा हप्ता सर्व संबंधित ऊस पुरवठादार सभासद/बिगर सभासद शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे.

युनिट नं.१ व २ कडे गाळप झालेल्या ऊसाचे दुस-या हप्त्यापोटी कारखान्याने ७८ कोटी ७६ लाख २३ हजार रूपये बँकेत वर्ग केलेली आहे. उर्वरीत तिसरा हप्त्यापोटी देय ऊस बीलाची रक्कम धोरणाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करणार आहोत. तसेच कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२१-२२ चे संपूर्ण कमिशन डिपाँझीट रक्कम ऊस वाहतुकदारांना यापूर्वीच अदा केलेली आहे.

ऊस गाळप हंगाम २०२२-२३ हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे गाळपक्षमतेएवढा ऊसाचा पुरवठा होण्साठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करार करणेची कार्यवाही सुरू आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला आहे अशी माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!