‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न.
टिम: विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सन २०२२-२३ च्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते व व्हा.चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा. आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगीतले की, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या गळीत हंगामासाठी सुमारे १४ लाख मे.टनाच्या ऊस नोंदी असुन या सर्व ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्याने तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार केले असुन त्यांना लवकरच अॅडव्हान्स हप्त्याचे वाटप करणार आहोत. कारखान्याकडे मागील गळीत हंगामात जास्तीचा ऊस असल्याने हंगाम जास्त दिवस चालुन उच्चांकी गाळप करुन उच्चांकी साखर पोती उत्पादित केलेली आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात ही जास्तीचे गाळप करण्याचा कारखाना व्यवस्थापणाचा मानस आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन व पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा कै.सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याची वाटचाल सुरु आहे.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगीतले की, कारखान्याने गत हंगामातील ऊसाची बिले, तो़डणी वाहतुक यंत्रणेची बिले वेळेवर दिली असुन कामगारांचे पगार, बक्षीस ही वेळेवर देत असुन कारखान्याकडे कोणत्याही प्रकारची बँकांची कर्जे थकीत नाहीत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असुन येणारा गळीत हंगाम हा कारखान्याच्या दृष्टीने रेकॉर्ड ब्रेक गळीत हंगाम राहणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील व अधिकारी उपस्थित होते .