सोलापूर जिल्हा

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया पुर्ण.

आता खरे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणावरती.


विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यातील नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये ४९ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०१९  पासून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र यानंतर कोरोना महामारी मुळे ही प्रक्रिया थांबली होती. नुकतीच २ नोव्हेंबर रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली असुन तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या  प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण अंतीम नमुना ‘अ’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात १८ ग्रामपंचायती मधून ४३ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतीवरती  उपविभागीय अधिकाऱ्यांनी विचार करून कायदेशीर बाबी तपासून निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अंतिम प्रभाग रचना नमुना ‘अ’ प्रमाणे निश्चित करून सदर माहीती तलाठी, मंडल अधिकारी व तहसिल कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती माळशिरसचे नायब तहसिलदार तुषार देशमुख यांनी दिली.
दरम्यान गावातील नेतेमंडळींचे खरे लक्ष आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले असुन लवकरच सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. माळशिरस तालुक्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुक रणसंग्राम सुरु होणार आहे. त्यामुळे आत्ता तालुक्यातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या गावात मोर्चेबांधणीला वेग येऊ लागलेला पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायती, त्यांची प्रभाग संख्या व सदस्य संख्या खालील प्रमाणे

अ.नंग्रामपंचायत नावप्रभाग संख्यासदस्य संख्या
१.पिंपरी११
२.कोंडबावी११
३.कुसमोड
४.महाळुंग१७
५.पिरळे११
६.बोरगाव१५
७.मोरोची१३
८.खळवे
९.कळंबोली
१०.गिरवी११
११.फोंडशिरस१७
१२.विठ्ठलवाडी
१३.गिरझणी११
१४.अकलूज१७
१५.कुरबावी
१६.माळखांबी
१७.भांब
१८.नातेपुते१७
१९.कोथळे
२०.संग्रामनगर१५
२१.बांगर्डे
२२.चाकोरे११
२३.रेडे११
२४.बोंडले
२५.तोंडले
२६.दसूर
२७.बचेरी११
२८.शिंगोर्णी११
२९.फडतरी११
३०.गणेशगाव
३१.बाभूळगाव
३२.गोरडवाडी११
३३.जळभावी
३४.विझोरी११
३५.एकशिव११
३६.तांदुळवाडी१७
३७.उंबरे(वे)
३८.मिरे
३९.मळोली१५
४०.शेंडेचिंच
४१.तांबवे११
४२.बिजवडी
४३.गारवाड११
४४.येळीव
४५.मांडवे१७
४६.विजयवाडी
४७.लोणंद
४८.शिंदेवाडी११
४९.मांडकी
तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायती पैकी महाळुंग, फोंडशिरस, अकलूज, नातेपुते, तांदुळवाडी, मांडवे या सहा ग्रामपंचायती मोठ्या ग्रामपंचायती असून त्यांची सदस्य संख्या १७ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!