राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू. – अॅड. गणेश पाटील.

मुलाखती दोन टप्प्यात होणार.

विजयदिप न्यूज.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी निवडीसाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली. तसेच इच्छूकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड यांच्या उपस्थित होणार आहेत.
सदर मुलाखती या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस व करमाळा तालुक्यातील इच्छुक सदस्य व पदाधिकार्याच्या मुलाखती दि. ८ नोव्हेंबर रोजी स.११ वाजता. अक्षता मंगल कार्यालय भोसे(क), टेंभूर्णी-पंढरपूर रोड वर जाधववाडी पाटी भोसे येथे होणार आहेत.
तर दुसर्या टप्प्यात मोहोळ, बार्शी, माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील इच्छुक सदस्य व पदाधिकार्याच्या मुलाखती दि.१० नोव्हेंबर रोजी स.११ वाजता. राष्ट्रवादी भवन रामलाल चौक, सोलापूर येथे होणार आहेत.
या मुलाखतीसाठी येताना मुलाखती देणार्यांनी त्यांच्या सोबत त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल व मागील झालेल्या निवडणुकांमध्ये मुलाखत देणारे ज्या गावच्या किंवा शहराच्या बुथवरून येतात त्या बुथवरून राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा आघाडीला किती मतदान झाले त्याची वर्गवारी सोबत ठेवावी असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
