इतर

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’कडून उसाला जिल्ह्यात सर्वाधिक पहिली उचल जाहीर.

जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम.

विजयदिप न्यूज

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी वाखरी (ता.पंढरपूर) येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चालू २०२३-२४ या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रति मे.टन २८०० रुपये देण्याची घोषणा करून जिल्ह्यात सर्वाधिक पहिला हप्ता जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक पहिली उचल देणारा ‘पांडुरंग सहकारी’ पहिला साखर कारखाना ठरला आहे.

‘पांडुरंग सहकारी’ कारखाना हा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना असून मागील अनेक वर्षे कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक दर दिला असल्याने यावर्षीच्या चालू २०२३-२४ या गळीत हंगामात सुद्धा ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखाना उसाला पहिली उचल जिल्ह्यात सर्वाधिक देणार याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास होता. तसेच पांडुरंग सहकारी हा उसाला पहिली उचल किती देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीबाबत दिवाळीनंतर मोठी घोषणा करून उसाला प्रति मे.टनास २८०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता जाहीर केल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी पुढे बोलताना चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये सुरवातीला १५ जानेवारीपर्यंत गाळपास येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रति मे.टन रुपये २८०० प्रमाणे असेल तर १६ जानेवारी २०२४ पासून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत उशिराने गाळपास येणाऱ्या उसाला आगाऊ ५० रुपये प्रति मॅट्रिक टन धरून २८५० इतका पहिला हप्ता देण्यात येणार असून १ फेब्रुवारी २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत उशिराने गाळप होणाऱ्या उसाला १०० रुपये प्रति मॅट्रिक टन आगाऊ धरून २९०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. तसेच ०१ मार्च २०२४ पासून पुढे उशिराने गाळपास येणाऱ्या उसाला १५० रुपये ज्यादा धरून २९५० इतका पहिला हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

असे असणार आहे ‘पांडुरंग सहकारी’च्या उसाच्या पहिल्या उचलीचे सूत्र

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक  दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव आदी उपस्थित होते.

कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक तसेच कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिला असून शेतकरी हिताय कामगार सुकाय ही कै.सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांची शिकवण जोपासलेली आहे. यापूर्वी कारखान्याने अनेक वर्षे सर्वोच दर देण्याची तीच परंपरा अखंडित ठेवली गेली आहे.

डॉ.यशवंत कुलकर्णी,

कार्यकारी संचालक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!