कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखान्याच्या साखर पोत्याचे पूजन.

श्रीपूर/प्रतिनिधी.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थीत होते.

यावेळी माहिती देताना चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२४ हा सुरळीत सुरु झाला असून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ‘पांडुरंग सहकारी’ साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास चांगला दर दिला जाणार असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये विस्तारीकरण केले असून प्रतीदिन ८ हजार ५०० ते ९ हजार मे.टनाप्रमाणे ऊस गाळप करणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना चालू हंगामात ऊस तोडणी लवकर मिळणार आहे. या हंगामात कारखान्याचे १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदीष्ट असून ते पुर्ण करणार आहोत. तसेच को-जन प्रकल्पही वाढीव क्षमतेने चालणार असून आसवनी प्रकल्प ९० हजार बल्क लिटर क्षमतेने चालविणार आहे. कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम व्यवस्थित झाले असून सर्व मशिनरी सुरळीत चालू झाली आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्याच्या ऑफ-सिझनमध्ये कारखान्याचे विस्तारीकरण केले, कारखाना पहिल्या दिवसापासून विना अडथळा सुरु झाला आहे. गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे. हा हंगाम कमी दिवसाचा असला तरीही कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ झालेने अपेक्षीत गाळप मा.आ.प्रशांतराव परिचारक आणि कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ व अधिकारी यांच्या सहकार्याने पुर्ण करणार आहोत.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.