महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस ७ कोटी १९ लाख रुपयांचे दान – राजेंद्र शेळके

विजयदिप न्यूज.

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस अधिकमासात विविध माध्यमांतून रक्कम रू.७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

१८ जुलै २०२३ ते १६ ऑगस्ट २०२३ या अधिकमास कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांना मंदिर समितीकडून पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अधिकमासात मंदिर समितीस विविध माध्यमांतून रक्कम रू.७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले असून सन २०१८ मध्ये रू.२ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. सन २०१८ च्या तुलनेने यावर्षीच्या अधिकमास उत्पन्नात ४ कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रूपये इतकी वाढ झाली. श्रींच्या चरणाजवळ, नित्यपुजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र, देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा, मोबाईल लॉकर इत्यादी माध्यमांतून सदरचे उत्पन्न मिळाले आहे.

या कालावधीत सुमारे ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे ५ लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.

अधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किंमतीचे सोने व ८ लाख १८ हजार ८५९ रूपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झाल्या आहेत. या सर्व प्राप्त देणगीतून भाविकांना अत्याधुनिक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा राहणार असल्याचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!