‘सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी’कडून ऊसाचा पहिला हप्ता जाहीर.
टीम: विजयदिप न्यूज.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून दराचे धोरण निश्चित केले असून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याकडे गाळपास येणार्या ऊसास २ हजार ३०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे दर देण्यात येणार असून पहिला हप्ता प्रती मे.टनास २ हजार रुपये प्रमाणे पंधरवडा वाईस देण्यात येणार आहे. तसेच ऊस वाहतूक दरामध्ये १३ टक्के दरवाढ करून पंधरवडा वाईज बिले अदा करण्यात येतील असे परिपत्रक कारखान्याकडून काढण्यात आले आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.
तसेच कारखान्याकडून उर्वरित बिलाची रक्कम दोन टप्प्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर सन २०२०-२१ मध्ये ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे. त्यांची एफआरपी प्रमाणे ऊस बिले शुक्रवार पासून संबधितांच्या बँक खात्यावर गटवार जमा करण्यात येणार आहेत.
सर्व ऊस पुरवठादार शेतकरी व वाहतूकदार यांनी परिपत्रकाची नोंद घेऊन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२१-२२ करिता जास्तीत-जास्त ऊस गळीतास देवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.