नवोदय विद्यालयासाठी माळखांबीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड.

टीम विजयदिप न्यूज.
माळखांबी (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निधी माने व रोहन आयरे या दोन विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश परिक्षेत निवड झाली असून माळखांबी शाळेतून नवोदयसाठी मुलांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती शाळा बंद असतांनाही वर्गशिक्षक प्रविण कळसाईत यांनी कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन पद्धतीने मुले सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात ठेवली. कळसाईत यांनी जोपासलेल्या गुणवत्तेच्या जोरावर जवळच्या गावातून त्यांच्या वर्गात मुले येतात. या यशासाठी शिक्षण विभागाच्या प्रगतीत विशेष लक्ष देणारे सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची प्रेरणा लाभली. तर माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,विस्तार अधिकारी महालिंग नकाते, प्रदिपकुमार करडे, बोरगांवचे केंद्रप्रमुख आनंद कचरे, मुख्याध्यापक अशोक पाटील व सर्व माळखांबीचे शिक्षक, ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
११ ऑगस्ट २०२१ रोजी नवोदय प्रवेश परिक्षा झालेली होती. माळखांबी येथील विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.