सोलापूर जिल्हा

ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांचा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार.

टीम विजयदिप न्यूज.

            आंतराष्ट्रीय पातळीवरील सात कोटी रूपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेले रणजितसिंह डिसले गुरूजी यांनी शनिवारी ३० जानेवारी रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीचे त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.

            जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्ञानदानचे काम करताना डिसले गुरूजी यांना त्यांनी केलेल्या कामाबध्दल युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. रणजितसिंह डिसले यांची निवड करताना तब्बल १४० देशांतील शिक्षकांचे नामांकन झाले होते. या सर्व शिक्षकांपैकी डिसले गुरूजी यांना हा पुरस्कार मिळण्याचा सन्मान लाभला. यावेळी जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता.

      ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे भारतातील पहिले शिक्षक ठरले आहेत. त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीचे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
      त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे वतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार  श्री ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ व हार देऊन करण्यात आला. त्यावेळी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!