सोलापूर जिल्हा

सावध पोलिसामुळे श्रीपुर येथे चोरट्यांचा चोरी करण्याचा उद्देश फसला.

चोरांच्या हल्यात पोलिस व पोलिस मित्र जखमी.

विजयदिप न्यूज.

      श्रीपुर (ता.माळशिरस) येथे रविवारी मध्यराञी २ ते २.१० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी किराणा मालाचे होलसेल दुकान फोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु सावध पोलिस कर्मचारी धनंजय झगडे यांच्यामुळे तसेच त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी होमगार्ड व पोलिस मित्र यांच्या सावधगिरीमुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा उद्देश फसला. त्यामुळे चोरट्यांना पोलिसावर दगड फेक करुन पळ काढावा लागला. यामध्ये पोलिस कर्मचारी धनंजय एकनाथ झगडे यांच्या डोक्याला मार लागून जखमी झाले आहेत. तर,  होमगार्ड सागर पवार, पोलिसमिञ अनिकेत यादव, विनोद कडलासकर, कुलकणीॅ हे किरकोळ जखमी झाले आहेत. अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५०४/२०२० अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३२३, ३२४, ३३२, ३४, ३५३, ३८०, ४५०, ५११ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.  पुढील तपास एपीआय मारकड करीत आहेत.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिवाळी सणाच्या काळात सोलापूर जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. श्रीपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी धनंजय झगडे यांनी होमगार्ड सागर पवार पोलीस मित्र अनिकेत यादव, विनोद कडलास्कर व कुलकर्णी यांच्यासमवेत नाका-बंदी लावली होती. रात्री दोनच्या सुमारास येणारी-जाणारी वाहने तपासणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून खंडाळीकडे जाणाऱ्या रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असणाऱ्या एका होलसेल किराणा दुकानाचे शटर उचकटून काढत असल्याचा आवाज येऊ लागल्याने पोलीस धनंजय झगडे आणि इतर चौघे आवाजाच्या दिशेने किरणा दुकानाकडे गेले असता. चोरट्यांना पोलिसांची चाहूल लागली त्यामुळे चोर अंधारात दुकानाच्या एका बाजूला लपले पोलीस धनंजय झगडे यांनी दुकानाचे पाहणी केली असता चोर चोरी करण्यासाठी आले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिस दुकानाच्या पाठीमागे अंधारात पाहण्यास गेले असता व चोरांचा तपास करत असताना त्यांच्यावर चोरट्यांनी दगडांचा हल्ला केला.

            त्यामध्ये एक चोर पकडला गेला, परंतु आडोशाला लपलेले त्याचे इतर साथीदार व पोलीस यांच्यामध्ये दगडफेक व हाणामारी सुरू झाली. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल धनाजी झगडे , सागर पवार व तीन पोलीस मित्र जखमी झाले. पकडलेला चोर व इतर सर्व चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याची माहिती अकलुज पोलिस स्टेशनला मिळताच अकलूजचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर पोलीस गस्त सुरू होती. यामध्ये जखमी पोलीस व पोलीस मित्र श्रीपूरच्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अकलूजचे उपविभागीय अधिकारी निरंजन राजगुरू व पोलीस निरीक्षक  भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!