माळशिरस तालुकाशेतीविषयक

विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार पाटील तर व्हा.चेअरमनपदी डॉ.रमेश बिडवे.

स्थापने पासुनची बिनविरोधची परंपरा कायम!

टिम: विजयदिप न्यूज.

बोरगाव (ता.माळशिरस) येथील विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी राजकुमार पाटील तर व्हा.चेअरमनपदी डॉ.रमेश बिडवे यांची बिनविरोध निवड झाली असून संस्था स्थापनेपासुनची बिनविरोधची परंपरा संस्थेच्या सभासदांनी कायम राखली.

चेअरमन व व्हा.चेअरमनपदाच्या निवडणुकीमध्ये चेअरमन पदासाठी राजकुमार पाटील तर व्हा.चेअरमन पदासाठी डॉ.रमेश बिडवे यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणुक अधिकारी एम. एल. शिंदे  यांनी जाहीर केली.

यावेळी  नुतन संचालिका  कुमूदिनी पाटील, संचालक पृथ्वीराज पाटील, सिताराम म्हसवडे, रंजना  पवार, सुनील पाटील, संतोष चोरमले, शशिकांत गरड, सुनील कुदळे, नामदेव गोसावी, भक्तराज  जवाहिरे, उद्यासिंह देशमुख हे उपस्थित  होते. 

यावेळी नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक यांचा सत्कार समारंभ सन्मान संपन्न झाला त्यावेळी संस्थेचे सभासद व बोरगांव ग्रामस्थ  उपस्थित होते.

निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एम. एल. शिंदे यांनी काम पाहीले,  तर सहाय्यक म्हणून  संस्थेचे सचिव विष्णू जाधव यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!