इतरमहाराष्ट्रमाळशिरस तालुका

नातेपुते शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित; राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिले निवेदन.

तसेच  इतर दिवशीही वेळेवर आणि सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिक व व्यापाऱ्यांनी सातत्याने व्यक्त केली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अकलूज येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

निवेदनात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात ठोस निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!