माळशिरस तालुका

यमाईदेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त.

पालखी सोहळा नाही, दोन जणांनाच पादुका आरतीसाठी मुभा.

विजयदिप न्यूज

महाळुंग (ता.माळशिरस) येथील यमाईदेवी मंदिरा समोर शनिवारी सकाळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र निर्माण झाले होते. तसेच मंदिर परिसरात खेळणी विक्रेत्यांनी दुकाने मांडण्यास सुरुवात केली होती. या सर्व परिस्थितीत देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या गर्दीचे प्रमाण वाढू लागले होते. याची माहिती मिळताच अकलूजचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी तातडीने मंदिर परिसरातील येणारे रस्ते बॅरिकेडच्या साह्याने बंद केले व सर्व भाविकांना तेथून माघारी पाठवले. तसेच पोलीस बंदोबस्त लावला.
यमाईदेवी मंदिरामध्ये दर वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षी कोविड-१९ मुळे शासनाने सर्व यात्रा रद्द केल्या आहेत. कुठेही गर्दी केली जाणार नाही, जमावबंदी कायदा सर्वत्र लागू आहे.
याचबरोबर विनामास्क, विना हेल्मेट, ड्रायविंग परवाना नसणार्‍या २५ टू व्हीलर चालकावरती महाळुंग व श्रीपूर येथील छ.शिवाजी महाराज चौकामध्ये कारवाई करण्यात आली. शनिवारी व रविवारी मंदिर परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त राहणार आहे. 

यमाईदेवी पादुका मंदिर येथे कोणत्याही प्रकारची पालखी निघणार नाही. तसेच परंपरेनुसार दोनच व्यक्ती पादुका चार चाकी मध्ये घेऊन जाऊन आरती करून माघारी येतील.
दत्तात्रय गुरव,
यमाईदेवी पुजारी, महाळुंग.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे भाविकांनी घरा मधूनच पूजा-अर्चा करावी, कोणत्याही मंदिरांमध्ये जाऊ नये, जमावबंदीचा कायदा लागू आहे. बाहेर पडताना मास्क, सॅनिटायझर आणि हेल्मेटचा वापर करणे गरजेचे असून नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
भगवान निंबाळकर,
पोलीस निरीक्षक, 
अकलूज पोलीस स्टेशन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!