अकलूज पोलीसांचा अभिनव उपक्रम.

गुरख्यांचा विमा व भरघोस मदतीचे आश्वासन.
टीम विजयदिप न्यूज.
अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांच्या मार्गर्दर्शनाखाली नेहमीच चांगले उपक्रम राबविले जात असून चांगल्या उपक्रमामुळे अकलूज पोलीस जनतेच्या पंसतीस उतरत आहेत. मग ते ऑपरेशन परीवर्तन असो, ग्रामसूरक्षा दल किंवा जनतेचे प्रबोधन असो नेहमी नवा विचार नवी प्रेरणा घेवून पोलीस काम करताना दिसत आहेत.

अकलूज पोलीसांकडून आता गुरख्यांसाठी नवीन उपक्रम राबविण्यात येत असून गुरखा नेहमीच रात्री येतो, परंतू त्या बद्धल कधी सहानूभूती किंवा दया कोणीच दाखवत नाही, याबाबत अकलूज चे पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी अकलूजमधील सर्व गुरखा यांना बोलावून ग्रामसूरक्षा दल समन्वयक पोलीस हवालदार रमेश सूरवसे-पाटील व समन्वय समिती पदाधिकारी विष्णू आंधळकर यांनी अडचणी विचारून गुरख्यांचा एक लाखाचा विमा काढण्याचे नियोजन केले. तसेच त्यांच्या राहण्यासाठी घराच्या, मूला-बाळांच्या व उत्पन्नाच्या अडचणीही सोडवण्यासाठी मदत करण्याचे नियोजीत केले आहे.
गुरखा हे जनतेच्या सूरक्षेसाठी बिनापगारी मिळेल ते पैसे घेवून जनतेची रखवाली करतात, लाखोची संपती वाचवितात मोटारसायकल चोरी, जनावर चोरी वाचवतात तसेच कधीच गुन्हेगारीकडे वळत नाहीत मग त्यांच्यासाठी माणूसकी मनात ठेवायला हवी असं समजून एक लाख रुपयाचा विमा सर्वांसाठी पोलीस विभागाकडून उतरविण्यात येणार असल्यामुळे सर्व गुरखा बांधवांना आनंद झाला व त्यांनी सर्व पोलीसांचे आभार मानले