महाराष्ट्रमाळशिरस तालुकाशेतीविषयक

विजेचा धक्का लागण्याने चुलत सासू–सुन व गाईचा जागीच मृत्यू.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत रसिका विठ्ठल रेडे (वय ६५) आपला मुलगा सचिन रेडे, सून व नातवंडांसह राहत होत्या. त्यांच्या चार जर्सी गाई शेडमध्ये बांधलेल्या होत्या त्यांच्या शेजारीच त्यांची चुलत सून प्रियंका अमोल रेडे (वय २८) या वास्तव्यास होत्या.

बुधवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी पाऊस सुरू होता. यावेळी गोठ्यात बांधलेल्या गाईंपैकी १ गाय मृत अवस्थेत दिसल्याने रसिका रेडे त्या पाहण्यासाठी गोठ्यात गेल्या. दरम्यान गोठ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसून त्या जागीच कोसळल्या त्यावेळेस त्यांची थोरली जाऊ अंबुबाई हरिदास रेडे या पहिल्यांदा त्या ठिकाणी गेल्यावरती त्यांना देखील विद्युत धक्का लागून त्या बाजूला फेकल्या गेल्याने बचावल्या. हे घटना लोखंडी जाळीतून प्रियंका रेडे पहात असताना त्यांचा जाळीला हात लागल्याने विजेचा धक्का बसला व त्या देखील जागीच मृत्यूमुखी पडल्या. घटनेची माहिती कळताच अमोल रेडे यांनी त्वरित पळत जाऊन महावितरणच्या राहोत्री मधील फ्युज काढून वीजपुरवठा खंडित केला.

मृत दोन्ही महिलांचे मृतदेह तसेच मृत जर्शी गाई पाहून परिसरात शोककळा पसरली. प्रियंका रेडे या जिल्हा परिषद शाळेत नुकत्याच शिक्षिका म्हणून कामाला लागल्या होत्या.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रविकुमार दासरी यांनी घटना स्थळी भेट दिली असून त्यांनी महावितरण विद्युत निरिक्षक वर्षा सुतार या येत्या दोन दिवसात घटना स्थळी भेट देतील व त्या पोलिसांना अहवाल देतील असे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच सपोनि विक्रम साळुंखे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

“मयत नोंद दाखल करण्यात आली असून संपूर्ण पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने ही घटना घडली. याबाबत विद्युत निरीक्षकांना कळवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरेल.”

विक्रम साळुंखे,

सपोनि, प्रभारी अधिकारी.

अकलूज पोलीस स्टेशन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!