महाराष्ट्र

कोरोनातून बरे झाल्यानंतर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील लागले कामाला.

तातडीने बैठक घेऊन रुग्ण व नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या प्रशासनाला सूचना.

टीम विजयदिप न्यूज.

कोरोनातून बरे झाल्यानंतर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील हे कामाला लागलेले असून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे तसेच अकलूज मेडिकल हब असल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातीलही कोरोना रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात अकलूज येथे येत आहेत. त्या तुलनेत येथे ऑक्सिजन व रेमडीसीवरचा प्रचंड तुटवडा निर्माण होत आहे. यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व विभागीय आयुक्त सौरभ राव यांना केली. आ.रणजितसिंह यांच्‍या विनंती नंतर सौरभ राव यांनी ऑक्सिजनचा टँकर तातडीने सोलापूर कडे रवाना केला आहे.

कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज (गुरुवार दि. २२) रोजी अकलूज येथे प्रशासकीय अधिकारी व माळशिरस तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी सर्व डॉक्टर्स व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऑक्सीजन आणि रेमडिसीवरचा तुटवडा यासंदर्भातील कैफियत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासमोर मांडली. त्यावेळी आ.रणजितसिंह यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भातील तक्रारीचा सुर मांडला. त्याशिवाय त्यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधून या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भातील चर्चा केली. पुढील दोन दिवसात ऑक्सीजन व रेमडिसीवरचा तुटवडा कमी होईल असे अभिवचन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आ.रणजितसिंह यांना दिले. सोलापूर साठी तात्काळ लिक्विड ऑक्सीजनचा टँकर पाठवतो असे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

या बैठकीला भाजपचे संघटन  सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी शमा पवार, पोलीस उपधीक्षक नीरज राजगुरू, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गट विकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रेनिक शहा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष खरतडे, सचिव डॉ.नितीन राणे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, डॉ.नितीन एकतपुरे, डॉ.धनेश गांधी, डॉ.सुधीर पोफळे, ऑक्सीजन पुरवठादार दृश्यांत ताम्हाणे, सचिन गायकवाड यांच्यासह तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोना झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तातडीची बैठक आयोजित करून रुग्ण व नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवेतील ऑक्सिजन घेऊन रुग्णांना ऑक्सिजन देणारे यंत्र उपलब्ध व खरेदी करण्यावर भर द्यावा.

तातडीचे उपचार करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व उद्योग साखर कारखाने आदी ठिकाणच्या सिलेंडर टाक्या उपलब्ध केल्या जाव्यात अशा सूचना आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रशासनास दिल्या. ज्या रुग्णांना सौम्य ऑक्सिजनची गरज आहे अशांसाठी हवेतील ऑक्सिजन घेऊन रुग्णांना ऑक्सिजन देणारे यंत्र उपलब्ध व खरेदी करण्यावर भर द्यावा असे आ.रणजितसिंह यांनी सांगितले.

ऑक्सीजन निर्मितीचा प्लांटवॉर रूम सुरू करावी.

अकलूज येथे ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट उभा करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. १ मे पासून होणाऱ्या मेगा लसीकरण मोहीमेवेळी गर्दी टाळण्यासाठी लस घेणाऱ्यांच्या नोंदीप्रमाणे ज्यांचा नंबर आला आहे त्यांनाच बोलावून लस द्यावी त्यासाठी वॉर रूम सुरू करावी असे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी सुचवले.

पोलीस यंत्रणा प्रत्येक गावात जनजागृती संदर्भातील दवंडी देण्याचे कार्य सुरू करेल.

प्रत्येक गावात सकाळ-संध्याकाळ जाऊन दक्षता घेण्यास संदर्भातील दवंडी द्यावी या संदर्भात येथे चर्चा झाली. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात पोलीस यंत्रणा जनजागृती संदर्भातील दवंडी देण्याचे कार्य सुरू करेल असे पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी या बैठकीत सांगितले.

 रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि प्रशासन यांना मोठ्या भीषण समस्येचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि रुग्ण संख्या यामध्ये खूप मोठी तफावत आहे. लागणारी औषधे व यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर आपला पाठपुरावा सुरू आहे. पुढील दोन दिवसात या संदर्भातील टंचाई कमी होणे अपेक्षित आहे.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील.

अकलूज मोठे मेडिकल हब असल्याने माळशिरस तालुक्यात शेजारील तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत आहेत. सध्या येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर वरील रुग्णांची संख्या ४२२ आहे. त्यापैकी १७० रुग्ण हे इंदापूर, माढा, करमाळा, बारामती परिसरातील आहेत. त्या तुलनेत येथे रेमडिसीवर व ऑक्सिजनचा पुरवठा केवळ दहा टक्केच उपलब्ध होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

शमा पवार, उपविभागीय अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!