महाराष्ट्र

तांदुळवाडी ग्रामपंचायतीचा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा राज्यातील बहुतांशी पहिलाच प्रयोग.

टीम विजयदिप न्यूज.

सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीने आपल्या गावातील रुग्णांसाठी लोकसहभागातून कोविड सेंटर उभारून या कठीण काळात राज्यात नवीन आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

देशात व राज्यात कोरोना संसर्गाचा पार्दुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजला आहे. ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नाहीत तसेच ऑक्सिजनचा सुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण परस्थितीत रुग्णांची मानसिकता ढासळत आहे. यावरती उपाय म्हणून आपल्या गावातील रुग्णांना आपल्याच गावात उपचार मिळावेत व गावातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तांदुळवाडीत ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून हनुमान विद्यालय इमारतीमध्ये कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते या कोविड सेंटरचा शुभारंभ झाला. राज्यातील बहुतांशी हा पहिलाच प्रयोग आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये २५ बेडची सोय केली असून औषधोपचार पूर्णपणे मोफत राहणार आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पिलीव आरोग्य केंद्राचे डॉ.माने देशमुख, डॉ. राहुल मिले, डॉ.विजय निलटे, तांदुळवाडी ग्रामपंचायत मार्गदर्शक अॅड. नागेश काकडे, तांदुळवाडीच्या सरपंच भामाबाई जाधव, उपसरपंच शशिकांत कदम, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कमी लक्षणे किंवा अतिसौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांना येथे उपचार केले जाणार आहेत. तांदुळवाडी परिसरात सध्या २७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ही संख्या वाढू नये यासाठी तांदुळवाडी ग्रामपंचायत काळजी घेत असून कोणीही घरी राहून किंवा बाहेर फिरून गावात संख्या वाढवू नका,  कोरोनाची लाट गावातच थांबवण्याचा कोवीड केअर सेंटरच्या माध्यमातून आमचा प्रयत्न राहणार असल्याचे नागेश काकडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!