कोरोना नंतर शिक्षकांची जबाबदारी वाढली; अर्जुनसिंह मोहिते-पाटील.

अकलूज मध्ये तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न
टीम विजयदिप न्यूज.
कोरोना काळात पंचायत समिती शिक्षण विभागाचा ऑनलाईन आनंदी शाळा हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान करून माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कौतुकास्पद काम काम केले आहे, असे गौरवोद्गार काढताना कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान शाळा सुरू झाल्यानंतर कमीत-कमी वेळात भरून काढण्याची शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे. असे प्रतिपादन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माळशिरस शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सन्मान कर्तृत्वाचा सन्मान, तंत्रस्नेहीचा’ या सन्मान सोहळ्यात बोलत होते. स्वर्गीय शिक्षक नेते वसंतराव मगर गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्यासह १४६ तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान करताना आ.राम सातपुते, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, सरचिटणीस बब्रुवाहन काशीद, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा चंदाराणी आतकर, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष संजय चेळेकर, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, स्टार आधिकारी महालींग नकाते, अशोक मगर आदि मान्यवर उपस्थित होते.
आमदार सातपुते यांनी माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या तंत्रस्नेही सन्मान उपक्रमाचे कौतुक करून युवा शिक्षक मित्रांच्या जुन्या पेन्शन चा विषय विधिमंडळात लावून धरण्याची भूमिका जाहीर केली. संभाजीराव थोरात यांनी मोहिते-पाटील परिवाराच्या शिक्षकांबद्दल च्या योगदानाचा उल्लेख करून संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आणि गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनीही शिक्षक संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी नूतन कार्यकारिणीचीही यावेळी घोषणा केली.
तालुका महिला आघाडी अध्यक्ष- प्रतिभा गोडसे-मोहिते, बीट-माळशिरस; सरचिटणीस: किरण घाडगे-माने, बीट वेळापूर; तालुका कार्यकारिणी: अध्यक्ष-विजय शिंदे, बीट-नातेपुते; सरचिटणीस-मनोहर एकतपुरे, बीट-वेळापूर; कार्याध्यक्ष-विजय भोसले, बीट -अकलूज, राजकुमार भोसले, बीट-वेळापूर ; कोषाध्यक्ष: संतोष पवार बीट-नातेपुते; प्रसिद्धीप्रमुख- केशव मोरे,बीट माळशिरस; उपाध्यक्ष-विनोद थोरात बीट-अकलूज,राजू गोरवे बीट पिलीव; सल्लागार- बाळासाहेब कांबळे, बीट-अकलूज. अखिल भारतीय शिक्षक महासंघ संघटक- दिलीप ताटे, बीट-अकलूज.