महाराष्ट्रशेतीविषयक

स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी नीतिमूल्ये कशी जतन करायची हे मला शिकवले.- डॉ.यशवंत कुलकर्णी.

डॉ.यशवंत कुलकर्णी यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) च्या कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड.

टिम: विजयदिप न्यूज.

‘पांडुरंग सहकारी’मध्ये येण्यापूर्वी देखील मी साखर कारखान्याचा कार्यकारी संचालक होतो. परंतु साखर कारखाना कसा चालवायचा असतो आणि त्याची नीतिमूल्ये कशी जतन करायची असतात हे मला ‘पांडुरंग सहकारी’मध्ये आल्यानंतर स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी शिकवले. त्यांच्या परिसस्पर्शाने माझी कारकीर्द सोनेरी झाली असल्याचे मत श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

डॉ.यशवंत कुलकर्णी यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) च्या कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा पांडुरंग कारखान्याच्या कामगारांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलत होते.

स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी व त्यांच्या पश्चात आ.प्रशांत परिचारक यांनी देशातील एक आदर्श साखर उद्योग म्हणून श्री पांडुरंग कारखान्याला नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे. शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जोपासणारा कारखाना म्हणून कारखाना देशात विख्यात आहे. अशा या आदर्श साखर कारखान्याचा कार्यकारी संचालक म्हणून मी पदभार घेतल्यानंतर कारखान्याच्या नावलौकीका प्रमाणे माझी ही कारकीर्द नाव लौकिकास आली. बेस्ट एमडी अशा सर्वोच्च पुरस्कारासह मला वैयक्तिक पातळीवर खूप पुरस्कार मिळाले आणि माझ्या कारकिर्दीत कारखान्याला देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून देखील पुरस्कार मिळाला हे मी अभिमानाने सांगतो असेही डॉ.कुलकर्णी म्हणाले.

कारखान्याच्या यशामध्ये स्व.सुधाकरपंत परिचारक, आ.प्रशांत परिचारक, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सर्व खाते प्रमुख, कामगार आणि महत्वाचे म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी यांचे मोठे योगदान असल्याचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.

कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी संतोष कुमठेकर, मुख्य लेखापाल रवींद्र काकडे, महेश देशपांडे, असावनी व्यवस्थापक आर.एस.पाटील, संगणक विभाग प्रमुख तानाजी भोसले, स्थापत्य अभियंता हनुमंत नागणे तसेच महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे नगरसेवक तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, मोहसिन पठाण, युनियनचे प्रतिनिधी विजय पाटील, अनंत जाधव कामगार व अधिकारी आदी उपस्थित होते. सुहास गाडे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!