पोलीस अधिकार्यासह इतर २० ते २५ जणांवर वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर; जमावबंदी आदेश मोडला.
कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – पोलीस निरीक्षक भगवानराव खारतोडे.
टीम विजयदिप न्यूज.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने घालून दिलेल्या जमावबंदी व कोरोना आदेशाचे पालन न करता वेळापूर (ता.माळशिरस) येथील पालखी मैदानावरती डीजे लावून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी वेळापूर स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे यांचे सह ७ व इतर २० ते २५ लोकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर हकिकत अशी की, दि.०२ मार्च रोजी संध्या. ७.३० ते ९.०० या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज चौकातील पालखी मैदान, वेळापूर येथे पोलीस नाईक विनोद साठे व त्यांचे हितसंबंधी मित्रांनी मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा केला. यामुळे मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून डीजे लावून त्यासमोर नाचून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढविण्याची हयगयीची कृती केली अशा आशयाची फिर्याद पोलिस. कॉंन्स्टेबल महेश पोरे यांनी दिली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे करीत आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांचा जो आदेश आहे त्या आदेशाचे जनतेने तंतोतंत पालन करावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टसिंग ठेवावे, कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत अशी आमची सर्वांना विनंती आहे.
भगवान खारतोडे ,पोलीस निरीक्षक वेळापूर.