विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा बरोबर

युनिट नं.२, करकंब कारखान्याच्या वजनकाट्यांची भरारी पथकाकडून तपासणी.
टीम: विजयदिप न्यूज.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार वजन काटे तपासणी भरारी पथकातील अधिकारी यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.२ करकंब येथील वजनकाट्याची अचानक तपासणी केली असता कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व ऊसवजनकाटे बरोबर असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत अधिक माहीती की, १५ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ९ वा.चे सुमारास जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार सी.बी.गायकवाड, निरीक्षक वैधमापनशास्त्र पंढरपूर विभाग, पंडीत कोळी, महसूल नायब तहसिलदार,पंढरपूर व पी.आर.शिंदे, लेखा परिक्षक श्रेणी-१, सहकारी संस्था(साखर), सोलापूर, शेतकरी प्रतिनिधी तुकाराम संभाजी पाटील (रा.शेळवे) व वैभव मोहन शिंदे (रा.बार्डी) यांचे भरारी पथकाने अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.२ करकंब येथील सर्व ऊस वजनकाट्याची तपासणी केली. वजन तपासले असता कारखान्याचे वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. ऊस वजन बरोबर असल्याचे आढळून आले आहे. यावेळी भरारी पथकाने सर्वांचे समोर पंचनामा करून ऊस वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व वजनकाटे बरोबर असल्याचे अहवालात नमुद केले आहे.
सदरप्रसंगी कारखान्याचे चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी, इन्स्ट्रमेन्ट इंजिनिअर डी.बी.सावंत, केनयार्ड सुपरवायझर एम.एन.गायकवाड व वाहन मालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.