इतर

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा मंगळवारी दिमाखदार प्रकाशन सोहळा.

टीम: विजयदिप न्यूज

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मंगळवार २८ डिसेंबर रोजी स.९ वा तहसील कार्यालय माळशिरस येथे प्रातांधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी दिली.

या प्रकाशन सोहळ्यास अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, माळशिरस चे तहसीलदार जगदीश निंबाळकर, माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका कृषी अधिकारी पुनम चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे प्रमुख हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते या वर्षी दिनदर्शिकेचे चौथे वर्ष असून या दिनदर्शिकेचा दिमाखदार प्रकाशन सोहळा तहसील कार्यालय माळशिरस येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी माळशिरस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष एल.डी वाघमोडे, उपाध्यक्ष मनोज राऊत, उदय कदम, सचिव संजय हुलगे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!