संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाला सदिच्छा भेट.

टीम: विजयदिप न्यूज.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूरला सदिच्छा भेट दिली.
वेळापूर येथील श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे जागेत श्री अर्धनारीनटेश्वर महाविद्यालय उभारणार आहे . हे महाविद्यालय तालुक्याच्या दक्षिण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व मंडळाचे माजी अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी श्री.महादेव देवालय देवस्थान ट्रस्टच्या जागेत महाविद्यालयासाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने या जागेची पाहणी मंडळाचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी केली .

या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह माने-देशमुख व सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश साळुंखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय माने, विरकुमार दोशी, तुकाराम जगदाळे, आस्लम शेख, महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य दादा साठे, प्रा.बिटू मोलाणे-भोसले, प्रा. मनोज नांगरे, प्रा.अभिजीत घाडगे, प्रा.आशा गायकवाड, प्रा.उर्मिला कोडग, राजेंद्र बामने, रविंद्र साळुंखे इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वेळापूर परिसरात महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू होत आहे. त्याची पाहणी करून संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी काही मौलिक सूचनाही केल्या.