माळशिरस तालुका

माळशिरस तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक.

टीम विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज शुक्रवार दि.१६ एप्रिल रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात नव्याने २२४ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत.

तालुक्यात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज अखेर १२३९ वरती जाऊन पोहचली असून आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात ११ तालुक्यात पैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या माळशिरस तालुक्यात झाली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. शुक्रवार दि.१६ एप्रिल रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल ११२९ कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली असून १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६८०२ वरती जाऊन पोहचलेली आहे.

माळशिरस तालुक्यात कोविड-१९ संसर्गामुळे बाधित होणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेन-दिवस वाढत चाललेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!