धरण पाणीसाठामहाराष्ट्र

उजनी अपडेट; भीमा खोर्‍यातील सर्व धरणक्षेत्रात मागील २४ तासात फक्त ८४ मी.मी पावसाची नोंद.

दौंडचा विसर्ग वाढला तर बंडगार्डनच्या विसर्गात घट.

टीम विजयदिप न्यूज.

पुणे जिल्ह्यातील भीमा खोर्‍यातील धरणक्षेत्रात मागील २४ तासात पावासाने विश्रांती घेतलेली असून उजनीच्या वरील सर्व २० धरणावरती फक्त ८४ मी.मी पावसाची नोंद झालेली आहे. परिणामी बंडगार्डनच्या विसर्गात घट होऊन १३ हजार ८३० क्युसेक्स एवढा झालेला आहे. आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी स.६ वा. उजनी धरण ७४.३८ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत असून मागील २४ तासात धरणाची टक्केवारी ३.९५ टक्क्यांनी वाढली असून पाणीसाठ्यात २.१२ टीएमसीने वाढ झालेली आहे. दौंड येथून उजनीत येणार्‍या विसर्ग वाढ होऊन तो २३ हजार ९९५ क्युसेक्स एवढा जरी झालेला असला तरी बंडगार्डन पुणे येथील विसर्गात घट होऊन तो १३ हजार ८३० क्युसेक्स एवढा कमी झालेला आहे.

आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी स.६ वा. उजनी धरणाची पाणी पातळी ४९५.६१० मी. एकूण पाणीसाठा २९३१.२२ द.ल.घ.मी म्हणजेच १०३.५० टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा ११२८.४१ द.ल.घ.मी म्हणजेच ३९.८५ टीएमसी एवढा असून धरणाची टक्केवारी ७४.३८ टक्के एवढी आहे.

भीमा खोर्‍यातील धरणांची स्थिती, सोडण्यात आलेला व पर्जन्यमान विसर्ग तक्ता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!