धरण पाणीसाठामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातून येणार्‍या विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरण ‘इतके’ टक्के भरले.

दौंडचा विसर्ग २१ हजार ५२५ क्युसेक्स.

टीम विजयदिप न्यूज.

उजनी धरणाच्या वरील पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे बरीच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून त्यामधून विसर्ग सोडण्यात येत आहे. हा विसर्ग सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणामध्ये येत असल्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून उजनी धरण आज मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सायं.६ वा. ७२.२९ टक्के एवढे झाले आहे.

भीमा खोर्‍यात सुरू असलेल्या कमी-अधिक पावसामुळे उजनी धरणात दौंड व बंडगार्डन पुणे येथून येणार्‍या विसर्गात वाढ होत असून दौंड येथील विसर्ग २१ हजार ५२५ क्युसेक्स तर बंडगार्डन पुणे येथील विसर्ग १८ हजार ९७० क्युसेक्स एवढा झालेला आहे.

आज मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सायं.६ वा. उजनी धरणाची पाणी पातळी ४९५.५०५ मी. एकूण पाणीसाठा २८९९.६४ द.ल.घ.मी म्हणजेच १०२.३९ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा १०९६.८३ द.ल.घ.मी म्हणजेच ३८.७३ टीएमसी एवढा असून धरणाची टक्केवारी ७२.२९ टक्के एवढी आहे.

भीमा खोर्‍यातील सर्वात मोठे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ३८.७१ टक्के एवढा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भीमा खोर्‍यात दमदार होणे गरजेचे आहे.

भीमा खोर्‍यातील धरणांची स्थिती व सोडण्यात आलेला विसर्ग तक्ता.

धरणाचे नांवटक्केवारीउपयुक्त
(TMC)
सांडवा विसर्ग
पिंपळगाव जोगे५१.४३२.००
माणिकडोह५६.३३५.७३
येडगाव७१.४२१.३९
वडज१००१.१७२६५५
डिंभे१००१२.४९२५००
घोड३३.४२१.६३
विसापूर९.७६०.०९
कळमोडी१००१.५१७२०
चासकमान१००७.५७९२५
भामा आसखेड९८.५९७.५६
वडीवळे९९.८०१.०७
आंद्रा१००२.९२७२२
पवना१००८.५१२२०८
कासारसाई९८.५७०.५६३००
मुळशी९७.०८१९.५७२७४०
टेमघर१००३.७१७४५
वरसगाव१००१२.८२१७७७
पानशेत१००१०.६५१७९०
खडकवासला१००१.९७७७०४
चिल्हेवाडी९६.३४०.७७८००
उजनी७२.२९३८.७३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!