‘पांडुरंग सहकारी’वरती पंढरपूर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्धल गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांची आतषबाजी.

टिम: विजयदिप न्यूज
श्रीपूर येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विधानपरिषदेचे माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडत पुन्हा चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे एकहाती सत्ता आल्याची वार्ता श्रीपूर मध्ये कळताच पांडुरंगचे अधिकारी व कामगार यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली.
निवडींनंतर चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे श्री.पांडुरंग सहकारी कारखानास्थळी गुरुवारी आगमन होताच कारखान्याच्या गेटवर मा.आ.प्रशांत परिचारक यांचे हलग्यांच्या कडकडाटासह, फटाक्यांची आतिषबाजी करत कारखान्याचे पदाधिकारी व कामगार यांनी गुलालाची मुक्त उधळण करत जंगी स्वागत केले. यावेळी कामगाराकडुन प्रशांतराव परिचारक व पांडुरंग परिवाराच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार करीत दैदिप्यमान विजया बद्दल अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कारखानाचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे, तानाजी वाघमोडे, वर्क्स मॅनेजर आर.बी पाटील, प्रोडक्शन मॅनेजर एम.आर कुलकर्णी, इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे, कम्युटर इंचार्ज तानाजी भोसले, मुख्य अभियंता अमोल बारटक्के, टाईम किपर सोपान कदम, परचेस मॅनेजर महेश देशपांडे, डिस्टलरी मॅनेजर आर.एस पाटील, को-जन मॅनेजर सचिन विभूते, कार्यालयीन अधिक्षक भिमराव बाबर, मुख्य रसायन अधिकारी मारुती उपासे, सुरक्षा अधिकारी सलगर युनियनचे विजय पाटील, अनंत जाधव आदी उपस्थित होते.