इतर

रिपाइंच्या वतीने माळशिरस तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आंदोलन.

बी.टी शिवशरण.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने आज मंगळवार १० मे रोजी माळशिरस तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाइंचे वतीने नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

त्याप्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले पश्चिम महाराष्ट्र सचिव एन. के साळवे तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले, तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे, ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर, जिल्हा युवक आघाडीचे कार्याध्यक्ष किरण धाईंजे, तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दशरथ नवगिरे, तालुका उपाध्यक्ष संजय भोसले, ज्येष्ठ पत्रकार बी. टी शिवशरण, श्रीपूर युवक आघाडीचे अध्यक्ष राजरत्न नाईकनवरे, श्रीपूर युवक आघाडीचे अध्यक्ष विश्वजीत भालशंकर, सरचिटणीस राजाभाऊ सुरवसे, समाधान लांडगे,  तालुका उपाध्यक्ष बाबूराव भोसले,  पी.सी गायकवाड, नितीन मोरे व अन्य पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

मागासवर्गीय अनुशेष भरावा, पाच एकर जमीन कसायला मिळावी,  १९२१ पुर्वीच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळावी, तसेच मराठा व ओबीसींना आरक्षण द्यावे, रेल्वे जागेवरील झोपड्यांना परवानगी द्यावी या  व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!